devsthan-lead-kedarnathdham

देवस्थान / सदंर्भ

श्री केदारनाथ धाम पंच देवालय संस्थान, नित्रळ

सातारा शहरापासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या व परळी, सज्जनगड विभागात निसर्गाच्या सान्निध्यात उरमोडी तीरावर असलेले आणि पूर्वजांच्या नितळ प्रयत्नातून निर्माण झालेल्या तळात अर्थात नित्रळमध्ये ग्रामदैवत श्रीकेदारनाथाचे भव्यदिव्य श्रीकेदारगाथ धाम पंच देवालयाची उभारणी देवालय प्रतिकृती (मॉडेल) त्याप्रमाणेच अद्धुत अशी झाली आहे.

धरण किंवा घर बांधल्याशिवाय उभे राहिल का? वस्त्र विणल्याशिवाय निर्माण होईल काय ? मूर्ती घडवल्याशिवाय अस्तित्वात येईल का? जे घडते त्यामागे असणारा हात नाकारता येईल काय? नाही ना? मग ग्रामदैवत श्रीकेदारनाथ धाम पंच देवालय उभारणी कार्य तरुणांचे प्रेरणास्थान व गावचे सुपुत्र समाजभूषण आदरणीय श्री. ज्ञानेथ्वर बापूसाहेब वांगडे (भाई) यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास आले आहे आणि या श्रीकेदारनाथ धामचा अविस्मरणीय लोकार्पण सोहळा सोमवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२२ रोजी होत असल्याचा आनंद होत आहे.

kedarnath-dham-about

kedarhnath-dham दिनक्रम kedarhnath-dham

kedarnath-dham
 • kedantha-dham

  उघडण्याची वेळ

  सकाळी ५ वाजता मंदिर

 • kedantha-dham

  आरती व अभिषेक

  सकाळी ६.३० वाजता

 • kedantha-dham

  दुपारची आरती व अभिषेक

  दुपारी १२.३० वाजता

 • kedantha-dham

  नैवेद्य व महाप्रसाद

  दुपारी १.३० वाजता

 • kedantha-dham

  हरिपाठ

  सायंकाळी ६ वाजता

 • kedantha-dham

  आरती नंतर महाप्रसाद

  रात्री ८ वाजता

kedarnath-dham

kedarnath-dhan-about मंदिराबद्दल माहिती kedarnath-dhan-about

श्रीकेदारनाथ धाम देवालयात श्रीकेदारनाथाच्या मूर्तीबरोबरच श्रीगजानन, श्रीभुवनेश्वरीदेवी, श्रीहनुमान, श्रीविठ्ठल रुक्मिणी या पाच देवांची पाच गाभाऱ्यात स्थापना होत असून श्रीकेदारनाथाच्या शेजारी शिवलिंग आणि अंगरक्षक श्रीकाळभैरवनाथाची स्थापना केली आहे व श्रीवेताळ, श्रीपद्मिनी, श्रीटोणप्या अशी विविध मंदिरि पच धाम परिसरात उभारली आहेत. गाभाऱ्याला आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट केली असून श्रीकेदारनाथाचे डमरू, त्रिशूळ, शंख, तलवार इत्यादी वस्तूंचा ठेवा आकर्षक जागी दर्शनी भागात मांडला आहे. गाभाऱ्यात सागाच्या लाकडाचा आर्च खास दहिसर, मुंबईहन बनवून पुणे येथून सोन्याचा मुलामा देऊन बसविण्यात आला आहे. गाभाऱ्याला राजदरबार स्वरूप प्राप्त झाले आहे. ग्रामदैवत श्रीकेदारनाथाच्या गाभार्‍याच्या मागील बाजूस उत्तराखंडमधील हिमालयाच्या कुशीत असलेले ज्योतिर्लिंग श्रीकेदारनाथ मंदिराचं हुबेहूब म्युर्ल साकारले असून भव्य दगडीमध्ये नंदी, दगडी दीपमाळ, दगडी तुळशीवृंदावन, पाच गाभाऱ्याला दगडी नक्षीदार चौकटी व सागाचे नक्षीकाम केलेले दरवाजे हे श्रीकेदारनाथ धामचे प्रमुख आकर्षण असून सर्व दगडी मूर्ती कर्नाटक राज्यातील बदामी व शंकेश्वर येथील कुशल कारागीरांकडून बनवल्या गेल्या आहेत.

मुख्य पूर्व व दक्षिण प्रवेशद्वाराला सागाच्या चौकटी व दरवाजे असून त्यांच्या आकर्षक पितळी कड्या, टाळे भाविकांना आकर्षित करणाऱ्या आहेत. जाळीदार व नक्षीकाम असलेली सुरक्षा भिंत, पाम जातीची उंच झाडे व देवालय परिसरातील स्ट्रीट लाईट सर्वाचे लक्ष वेधून घेते. तुमचा एक रुपया नदीतील एका पाण्याच्या थेंबासारखा आहे. असे कोट्यावधी थेंब एकत्र होऊनच नदीचा प्रवाह बनतो आणि त्यातून कालवा काढल्यास ही भूमी सुजलाम होते. अगदी तसेच श्रीकेदारनाथ धाम उभारणीचे आहे. पंच धाम उभारणीसाठी सहकार्य करणाऱ्या माहेरवाशीण आणि असंख्य देणगीदारांच्या मदतीने नित्रळचे श्रीक्षेत्र नित्रळ झाले. आणि देणगीदारांचे स्मरण कायमस्वरूपी रहावे म्हणून त्यांच्या नावाचे फलक संस्थानाच्यावतीने दगडी दिपमाळेच्या शेजारील भिंतीवर कायमस्वरूपी बसवण्यात येत आहेत. भाविकांच्या स्वागतासाठी द्वारपाल, भव्य गजराज व काचेच्या ख्रिडक्यांवरील नक्षीदार चित्रे, विविध रंगांचे मारबल, सोज्वळ रंगरंगोटी हेही पंच धामचे प्रमुख आकर्षक आहे. विविध फुल झाडे लावून फुलांची स्वतंत्र बाग तयार करण्यात आली आहे.

परळी भागात प्रथमच पाच कळसाचे भव्यदिव्य असे पंचधाम निर्माण झाले आहे आणि हे परळी भागातच नव्हे; तर तालुक्‍यात पंचधाम म्हणून श्रीक्षेत्र नावारूपाला येणार यात शंकाच नाही. देवालयाच्यासाठी स्वतंत्र विहिरींची निर्मिती करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून ती सोरऊर्जवर कार्यरत आहे. सभामंडपच्या मागील जागेत श्रीअन्नपूर्णा सदन उभारलं असून या ठिकाणी प्रसादालयसाठीच्या सर्व सोयीसुविधांनी सज केलं आहे. प्रसादालयाशेजारी भाविकांसाठी स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे. प्रवेशद्वार क्रमांक २ च्या शेजारी एलिफंटा लेणीमधील भगवान शिव शंकर यांचे तांडव नृत्य करणारं शिल्प व बाजूने दगडावरून पाणी पडत असल्याचा मनमोहक देखावा आणि याठिकाणी असलेल्या आपलं नित्रळ या फलकामुळे जणू काय सेल्फिपॉइंटच झाला आहे. पंचक्रोशीतील पहिलाच असा भव्यदिव्य सभामंडप उभारला असून त्याला आदरणीय श्री. भाई वांगडे यांच्या वडिलांचे अर्थात स्वर्गीय बापूसाहेब रामचंद्र वांगडे यांचे नाव दिले आहे. ही एक मजली इमारत असून खालील भागात प्रशस्त रंगमंच व त्याच्यासोबत दोन खोल्या आणि वरील मजल्यावर संस्थान कार्यालय व त्यामध्ये आकर्षक फर्निचर केलं आहे. चित्ररुपी ' श्री केदारनाथ धाम प्रतिकृती हुबेहूब बनवलेले मॉडेल याठिकाणी सर्वांना पहायला ठेवले आहे. कार्यालयात महाराष्ट्राचे कुलदैवत श्रीजोतिबाचा फोटो, संस्थानचा लोगो लावलेला आहे. सर्व सोयीसुविधा असलेले भक्तिनिवासकरिता दोन खोल्या, ब्राम्हण निवास, स्वयंपाक घर व स्वच्छतागृह अशी निमिर्ती केली आहे. सभामंडपच्या दर्शनी भागात गावची संस्कृती, सण यांचे देखावा म्युरलमध्ये साकारले आहे. टेरेसवर १५ फूट उंच फायबरमध्ये श्रीकेदारनाथ शिवलिंग तयार करण्यात आलेले आहे व हे भव्यदिव्य शिवलिंग लांबून भाविकांच्या मनाला भुरळ घालत आहे. पंच धाममध्ये दोन आकर्षक लोखंडी प्रवेशद्वार आहेत.

श्रीकेदारनाथ धाम देवालयाच्या नावे वेबसाईट, फेसबुक पेजसारख्या सोशल मीडियाचा अवलंब ग्रामस्थांनी स्विकारला असून आकर्षक लोगो व पंच देवालयामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या वयोवृद्ध भाविकांनाही सुलभ दर्शन व्हावे याकरिता मंदिरांच्या पायऱ्यांच्या सोबत व्हिलचेअरसाठी विशेष मार्ग, पायधुनी, चप्पल स्टँड, पिण्याच्या पाण्याची सोय इत्यादी विविध सोयी श्रीकेदारनाथ धाम पंच देवालयमध्ये करण्यात आल्या आहेत. पंच देवालय ते उरमोडी धरणाच्या पात्रापर्यंत श्रीविष्णू धार्मिक विधी घाट निर्माण झाला असून घाट रस्त्याच्या कडेला विविध झाडांचे वृक्षारोपण केले आहे. घाट विविध धार्मिक विधीसाठी सज्ज करण्यात येणार आहे व सदर घाटावरून उरमोडी पात्रातून पलीकडे असलेल्या श्रीकेदारनाथाचे अर्थात श्रीशंकराचे परमभक्त श्रीशुक्राचार्य व श्रीशुक्‍लेश्वर महादेव शिवलिंग मंदिराकडे आणि श्रीमहालक्ष्मी (श्रीमरीआई) मंदीराकडे भाविकांना दर्शनासाठी बोटीतून जाण्याची सोय भावी काळात करण्यात येणार असून पंच धाम देवालय परिसर सुशोभित करून बारा ज्योतिर्लिंग थीमपार्क, ध्यानकेंद्र, ग्रामसंग्रहालय, गोशाळा, पार्किंग व्यवस्था, स्थानिक उत्पादन मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठ अशा आवश्यक अद्यावत सेवा लवकरच उपलब्ध करण्याचा मानस ग्रामस्थ मंडळ व संस्थान करीत आहेत.