suvidha-leadkedarnathdham

सुविधा

kedarnath-dham सभामंडप kedarnath-dham

परळी पंचक्रोशीतील पहिलाच असा भव्य-दिव्य सभामंडप उभारला असून त्याला आदरणीय श्री. भाई वांगडे यांच्या वडिलांचे अर्थात 'स्व.बापूसाहेब रामचंद्र बांगडे सभागृह असे नाव दिले आहे. ही एक मजली इमारत असून खालील भागात प्रशस्त रंगमंच व त्याच्यासोबत दोन खोल्या आणि वरील मजल्यावर संस्थान कार्यालय अशी वास्तू निर्माण केली आहे. सभामंडपाच्या टेरेसवर १३ फूट उंच भव्यदिव्य शिवलिंग उभारण्यात आले आहे. रंगमंचावर भाविकांसाठी समाजप्रबोधन, किर्तन, मनोरंजन करण्याचा मानस असून पंचक्रोशीतील नागरीकांना आपले अनेक शुभकार्य उदा. लग्न, बारसे, वाढदिवस इत्यादी धार्मिक विधी तसेच शोकसभा इत्यादीसाठी माफक दरात सभामंडप उपलब्ध होणार असून शहराकडे लांबवर न जाता जबळच आपली कार्य करून त्यांची आर्थिक बचत होणार आहे.

kedarnath-dham
kedarnath-dham

श्रीअन्नपूर्णा सदन kedarnath-dham

सभामंडपच्या मागील जागेत 'श्रीअन्नपूर्णा सदन' उभारले असून सदर सदन श्री शिर्डी साईबाबांचा प्रसाद बनवतानाचा फोटो व विविध श्लोकांची मांडणी करून सुशोभित केले आहे. आवश्यक भांडी व लागणाऱ्या सर्व वस्तू तसेच इतर सर्व सोयी-सुविधांनी प्रसादालय सुसज्ज केले आहे. संस्थानाच्या माध्यमातून दर्शनासाठी आलेल्या भाविकांना नियमित महाप्रसाद देण्याचा मानस आहे. याठिकाणी प्रसादालयाशेजारी भाविकांसाठी स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे.

श्रीकेदार गोशाळा

हिंदू संस्कृतीमध्ये देशी गाईला विशेष स्थान आहे. संस्थानने देशी गाई सांभाळून गोसेवा व्रत हाती घेतले आहे. त्याच्या नियोजनाकरिता एक कुटूंब ठेवले असून गोशाळेत गाईचे शेण, गोमुत्र यापासून विविध प्रकारची उत्त्पादने बाजारात उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करत आहे. या व्यतिरिक्त दुधापासून बनणारे विविध पदार्थ- उदा. मसाला दध, दही, तूप भाविकांना थेट कसे देता येईल यावर नियोजन चालू आहे.

kedarnath-dham
kedarnath-dham

श्रीविष्णूधाम धार्मिक विधी घाट

हिंदू धर्माप्रमाणे पिंडदानसारख्या धार्मिक विधी करण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांना खर्च करून लांबवर जावे लागते. ही बाब संस्थानाने लक्षात ठेवून श्रीकेदारनाथ धाम ते उरमोडी धरण पातळी या भागात श्रीविष्णूधाम धार्मिक विधी घाटाची निर्मिती करण्यात आली असून या ठिकाणी आर्थिक बचत करून आपण धार्मिक विधी संपन्न करू शकतां. धार्मिक विधी शिवाय आगामी काळात याच ठिकाणी बोटींग क्लब सुरू करण्याचे नियोजित केले असून पर्यटन म्हणून नागरिकांना उरमोडी बॅक वॉटर व निसर्गाचा आनंद घेता येईल.

श्रीशिवधाम स्मशानभूमी

हिंपंचक्रोशीमध्ये अजूनही उघड्यावर अंत्यसंस्कार केले जातात. ज्या ठिकाणी स्मशानभूमी आहेत अशा गावातही पावसाळ्यात मोठी समस्या निर्माण होते. या सर्व बाबींचा संस्थानाने विचार करून गावातील तसेच पंचक्रोशीतील नागरीकांच्या सोयीसाठी श्रीक्षेत्र नित्रळ येथे भव्य-दिव्य व सर्व सोयी-सुविधा असणारे तसेच दळणवळणासाठी योग्य असणाऱ्या श्रीविष्णू धार्मिक विधी घाटाच्या अगदी थोड्या अंतरावर श्रीशिवधाम स्मशानभूमीची उभारणी केली असून त्या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी आवश्यक सुक्‍या लाकडांचा साठा असणारी खोली व उभे राहण्यासाठी प्रशस्त जागा, पाण्याची सोय करण्यात आली. तिचा वापर पंचक्रोशीतील सर्वसामान्य नागरीकांना करता येणार आहे.

kedarnath-dham
kedarnath-dham

श्रीकेदारनाथ धाम भक्त निवास

सभामंडप इमारत एक मजली बनविली असून संस्थानचे कार्यालय पहिल्या मजल्यावर आहे. भाविकांना राहण्यासाठी कार्यालयशेजारी सध्या दोन खोल्या तयार केल्या असून सर्व सोयी-सुविधांनी सज्ज आहेत. भावी काळात भव्य अशी भक्तनिवासाची स्वतंत्र इमारत बांधण्याचा संस्थानाचा मानस आहे.

वाहन तळ

श्रीकेदारनाथ धाम पंच देवालयाच्या उभारणीचे कार्य अंतिम टप्प्यात आहे. श्रीक्षेत्र नित्रळमध्ये वाहनांची कोंडी होऊ नये याकरिता भाविकांसाठी संस्थानाने वाहनतळाची निर्मिती केली आहे. सदर ठिकाणी वाहनतळ देखरेख व व्यवस्थापन करण्यासाठी संस्थानचे सेवेकरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

kedarnath-dham
kedarnath-dham

श्रीकेदारनाथ पुष्पबाटिका

श्रीकेदारनाथ धाम पंच देवालयमधील दररोज देवतांची पुजा अर्चा करण्यासाठी लागणाऱ्या फुलांचा विचार करुन संस्थानाने खालील बाजूस फुलांची बाग तयार करुन घेतली आहे. यात झेंडू, मोगरा, बेल, तुळशी, जास्वंद इत्यादी झाडे लावली असून या बागेसाठी २००० लिटर पाण्याच्या टाकीची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. बागेची काळजी नियमितपणे घेतली जाते.

हेमांडपंथी "शिव-तांडव" सेल्फी पॉइंट

हल्ली ज्या विभागात जाऊ त्या विभागावर प्रेम असणारा सेल्फी पॉइंट बघायला मिळतो. संस्थानाच्या माध्यमातून प्रवेशद्वार क्र. २ शेजारी श्रीकेदारनाथ अर्थात भगवान श्रीशिवशंकर यांचे शिव-तांडव करणारे शिल्प आहे. सदर शिल्प जगप्रसिद्ध अजंठा वेरूळमधील वेरूळ या गावातील कैलास मंदिरातील सुंदर शिल्पांपैकी एक आहे. सदर शिल्पामध्ये विशेषत: श्रीमहादेव दशभूजा दर्शविले आहेत. यामध्ये श्रीमहादेव शिव तांडव नृत्य करताना दिसून येतात. या शिल्पाची हुबेहूब प्रतिकृती साताऱ्यातील बालशिल्पकार कु. मंदार महेश लोहार याने साकारलेली आहे. शिल्पाच्या बाजूने पडणारे पाणी असा सुंदर देखावा करुन श्रीक्षेत्र नित्रळ' असे नाव लिहन नित्रळ गावाची होणारी नवीन ओळख दाखविण्याचा सुंदर प्रयत्न श्रीकेदारनाथ धाम संस्थानाने केला आहे. सदर ठिकाणी भाविक-पर्यटकांना सेल्फी काढण्याचा मोह आवरता येणार नाही, असा देखावा साकारण्यात यश आले आहे.

पर्यटन व्यवसायामुळे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरण विषयक विकास होण्याबरोबरच पर्यटनस्थळ परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनमानातही बदल घडून येतो. पर्यटकांना आवश्यक असणाऱ्या भक्तनिवास, भोजन, वाहतूक, माहिती, मनोरंजन आदी व्यवस्थेसोबतच त्या भागातील उत्पादनासाठी देखील मागणी निर्माण होते. म्हणूनच संस्थानाने पर्यटनाला वाव मिळावा व रोजगार निर्मिती व्हावी या उद्देशाने आगामी काळामधे खालील उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे.

kedarnath-dham